सांगवी, दि. २६( punetoday9news):- सांगवी येथे गेली २७ वर्षे खानावळ चालवणाऱ्या वाडकर या दांपत्याचा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विजेता फाउंडेशनच्या अध्यक्ष डाँ श्वेता इंगळे व विजय इंगळे हे उपस्थित होते. कोरोना सारख्या महामारी मध्ये जग बंद झालेलं असताना पुण्या सारख्या शहरात गावाकडून आलेल्या शेकडो मुलांसाठी जेवणाची सोय वाडकर दाम्पत्याने कोणत्याही प्रकार च कारण न देता आपली सेवा अविरत चालू ठेवली. यावेळी बोलताना विजय इंगळे म्हणाले की, “कोरोना सारख्या काळा मध्ये एवढी परस्थिती खराब होती की जिवंत माणसांच्या यादीत आपण असू की नसू याची खात्री नव्हती, उद्योग व्यवसाय बंद पडले, नोकऱ्या गेल्या पण अश्या ही परिस्थिती मध्ये जे आपल्याकडे आहे त्यातून समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ही भावना मोठी आहे.”
यावेळी अध्यक्ष म्हणून बोलताना महेश लाड म्हणाले की, “नोकरदारांना महिन्याला पगार, आठवड्याला सुट्टी, विमा संरक्षण, बोनस, ६० व्या वर्षा नंतर निवृत्ती वेतन आहे पण हे वाडकर दाम्पत्य आज ८० वर्ष वय होऊन सुद्धा अविरतपणे सेवा देत आहेत, म्हणून त्यांचा आजच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सत्कार करण्याचा आमचा मानस होता.”
या कार्यक्रमाचे आयोजन स्वराज्य संग्राम च्या वतीने करण्यात आले होते.सुरज कुलकर्णी, शरद मोरे, संदीप कोकाटे, संदीप पाटील यांच्या सह डाटर्स मॉम च्या ज्योती लाड, मनीषा पुरी, उज्वला मोरे आदींसह मान्यवर उपस्थित होते.


Comments are closed