मुंबई, दि. २३( punetoday9news):- अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना सलग आठ तासांच्या चौकशीनंतर मलिक यांना अटक करण्यात आली आहे.
ईडीच्या कार्यालया बाहेर कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी असून घोषणाबाजी केली जात आहे नवाब मलिक यांना वैद्यकीय तपासणीसाठी जे जे रुग्णालयात देण्यात येत असून त्यानंतर न्यायालयात नेण्यात येणार आहे.
या अटकेवर बोलताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की बीजेपी चे लोकच चालवत असल्याचे वाटत आहे.
तर राष्ट्रवादी पक्षातर्फे ट्विट करण्यात आले आहे त्यात लिहिले आहे कि,
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर सूडभावनेने होत असलेल्या कारवाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. केंद्रीय यंत्रणा व भाजपविरोधात प्रचंड घोषणाबाजी करत त्यांनी या लोकशाहीविरोधी कारवाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
राज्याचे कॅबिनेट मंत्री मा. @nawabmalikncp यांच्यावर कोणतीही नोटीस किंवा पूर्वसूचना न देता ईडीने आज कारवाई सुरु केली आहे. या कारवाईबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, माजी खासदार मा. माजिद मेमन यांनी शंका उपस्थित करत ही कारवाई बेकायदेशीर असल्याचे सांगितले. pic.twitter.com/lYcuhPuXDL
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) February 23, 2022

Comments are closed