पुणे, दि. २०( punetoday9news):- पुणे शहरातील म्हात्रे पूल ते महालक्ष्मी लॉन्स ( डी.पी. रस्ता ) या दरम्यानच्या हरित पट्टा व ब्ल्यू लाईन मधील ४ लक्ष चौ . फुट अनधिकृत बांधकामावर बांधकाम विकास विभाग झोन क्र . ६ च्या वतीने कारवाई कारवाई करण्यात आली.
पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन क्र ६ कडून (दि.२०) रोजी म्हात्रे पूल ते महालक्ष्मी लॉन्स दरम्यानच्या कारवाईमध्ये लॉन्स , गॅरेज , हॉटेल्स तसेच इतर व्यावसायिक वापराच्या मिळकतींवर कारवाई करण्यात आली .
माधव जगताप , उप आयुक्त अतिक्रमण विभाग यांनी आवश्यक तो सेवक वर्ग व मशिनरी उपलब्ध करून दिल्या होत्या . सदर कारवाईमध्ये ७६ मिळकतींना नोटीस देण्यात आलेल्या होत्या . त्यापैकी ८ मिळकतींना मे . कोर्टाचा स्टे असल्याने सदर मिळकती सोडून इतर ६८ मिळकतींवर कारवाई करण्यात आली .
नदी पात्रालगतचा हरित पट्टा व ब्ल्यू लाईनमधील क्षेत्रामध्ये नागरिकांनी कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम तसेच भराव टाकण्याचे काम करणेत येऊ नये असे आवाहन बिपीन शिंदे , कार्यकारी अभियंता ( बांधकाम विकास विभाग झोन क्र ६ ) यांनी केले आहे .
तसेच यापुढेही सदर भागात कारवाई चालू राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे . सदर कारवाई बिपीन शिंदे , कार्यकारी अभियंता , झोन क्र . ६ यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली . सदर कारवाई ८ गटांमार्फत करणेत आली असून प्रत्येक गटामध्ये १ उप अभियंता , ५ बांधकाम निरीक्षक , १ सहाय्यक यांचा समावेश होता . कारवाई दरम्यान कार्यकारी अभियंता श्रीकांत वायदंडे , राहुल साळुंके , अजित सुर्वे तसेच उप अभियंता सुनील कदम , दीपक मांजरेकर , दत्तात्रय टकले , योगेंद्र सोनावणे , हनुमंत खलाटे , राजेश शिंदे , प्रताप धायगुडे व श्रीकांत गायकवाड तसेच शाखा अभियंता , कनिष्ठ अभियंता व सहाय्यक अशा ५० अधिकारी यांचा समावेश होता . सदर कारवाई २० जेसीबी , १२ गॅस कटर , ८ ब्रेकर तसेच २०० बिगारी , २५ पोलीस व १०० सुरक्षा रक्षक , १५ अतिक्रमण निरीक्षक यांचे सहाय्याने पूर्ण करण्यात आली .
Comments are closed