आंध्रप्रदेश ,दि. ११ असानी चक्रीवादळाच्यादरम्यान आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम येथील सुन्नापल्लीमध्ये सी हार्बर येथे सोनेरी रंगाचा रथ सापडला आहे . काल संध्याकाळी सोनेरी रंगाचा सुंदर रथ वाहत इथे आला .
हा रथ म्यानमार , मलेशिया किंवा थायलंडमधून वाहत – वाहत इथंपर्यंत पोहोचला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. संताबोमाली तहसीलदार जे चलमैय्या हे या सगळ्या प्रकरणावर म्हणाले की , ” हा रथ इतर कोणत्याही देशातून आलेला नसावा . रथाचा वापर भारतीय किनारपट्टीवर कुठेतरी चित्रपट चित्रित करण्यासाठी केला गेला असावा . पण उच्च भरतीच्या हालचालींमुळे ते श्रीकाकुलम किनाऱ्यावर आला असावा .
” नौपाड्याच्या एसआय यांनी सांगितलं की , “ हा रथ दुसऱ्या देशातून आला असावा . आम्ही गुप्तचर विभाग आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवलं आहे . ते याबाबत अधिक तपास करतील.”
त्यामुळे आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम येथील सुन्नापल्लीमध्ये सी हार्बर येथे सापडलेला हा सोनेरी रथ नेमका कुठला आहे . तो खरोखरच सोन्याचा आहे का? तो इथे कसा आला? याविषयी स्पष्टता नाही . मात्र किनारपट्टी लगत सापडलेल्या या रथाची चर्चा सोशल मिडिया वर जोरदार आहे .
Comments are closed