पुणे, दि. २६ ( punetoday9news):- खेड सातारा येथे आयोजित मेळाव्यात माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे बोलत होते, याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष अरुणराव तिखे, प्रदेश उपाध्यक्ष काळुराम अण्णा गायकवाड, प्रदेश उपाध्यक्ष हिरामन भुजबळ, नाना लोखंडे, अरुणा भुजबळ, विभागीय उपाध्यक्ष संजय बाबा करपे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अविनाश ठाकरे यांनी उपस्थित समाजबांधवांना मार्गदर्शन केले यावेळी संत सावता महाराज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
मान्यवरांना मागण्यांची निवेदने देण्यात आली. पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली. सीए परीक्षेत उत्तुंग यश मिळवणाऱ्या कु. माधुरी माळी हिचा सत्कार करण्यात आला. मेळावा यशस्वीतेसाठी अरुण यादव, प्रतिक कदम, शुभम कदम, जयश्री शिंदे, शकुंतला कदम, राजश्री कदम, राजेश कदम, सोमनाथ कदम, सर्जेराव कदम, गोरखनाथ नाना कदम, श्रीरंग कदम, जय गायकवाड तसेच तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
संजय बाबा करपे यांनी सूत्रसंचालन केले तर किरण भुजबळ यांनी आभार मानले.
पिंपरी चिंचवड मध्ये आज रंगणार न्यु होम मिनिस्टर कार्यक्रम. खेळ पैठणीचा.
जेजुरीत वाहतुकीचे तीनतेरा, वारंवार होतेय वाहतूक कोंडी.
सोन्याचा रथ आला समुद्रात वाहून.
Comments are closed