पक्षाशी कायम एकनिष्ठ म्हणून ओळखले जाणारे एकनाथ शिंदेनीच फोडली शिवसेना. 

दिल्लीत खलबत : नितिन गडकरी, देवेंद्र फडणवीस दिल्लीत. 

सेना आमदार रात्रीच सुरतमध्ये. शरद पवार – मुख्यमंत्री  उद्धव ठाकरेंची सायंकाळी होणार भेट. 

शिंदेंची मनधरणी करण्यासाठी मिलिंद नार्वेकर, रवींद्र फाटक मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन सुरतला रवाना. 

एकनाथ शिंदेच्या तीन अटी 

भाजपात सरकार स्थापन व्हाव.

काँग्रेससोबत कसल्याही परिस्थितीत राहू नये.

मुख्यमंत्री फडणवीस तर उपमुख्यमंत्री पद शिंदे यांना असाव.

दरम्यान दिल्लीत नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री पद शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे असे सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादी या बंडखोरी प्रकरणात लांब राहणार असे चित्र निर्माण झाले आहे.

तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांची 18 आमदारांसोबत वर्षा बंगल्यावर बैठक झाली असून यामध्ये त्यांनी सरकारला धोका नसल्याची माहिती आमदारांना दिल्या आहेत तसेच आपण सर्व सोबत राहून भगव्याचे रक्षण करूया असा विश्वास दिला आहे.

आता यानंतर सर्वांची नजर लागली आहे ती म्हणजे सुरत कडे कारण या ठिकाणी एकनाथ शिंदे व बंडखोर आमदार आहेत तसेच त्यांच्यासोबत भारतीय जनता पक्षातील वरिष्ठ नेते चर्चा करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

सुरत मधील ली मेरिडीयन हाॅटेल मध्ये सेनेचे बंडखोर ३५ आमदार .

 

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!