१ जुलै ‘डाॅक्टर डे’ निमित्त प्रसिद्ध दंतचिकित्सक डाॅ. आदित्य पतकराव यांच्या कार्याचा आढावा.
पिंपळे गुरव, दि. १ ( punetoday9news):- मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात असणाऱ्या आंबेजोगाई येथील सामान्य कुटुंबात जन्मलेला मुलगा, घरची परिस्थिती तशी बेताची ! तरीही शिक्षणाची जिद्द मनाशी होती.
डॉ. आदित्य पतकराव यांचे वडील बस चालक आणि आई गृहिणी होती. आईवडील आणि भाऊ बहिण यांच्यासोबत आदित्य लहानाचे मोठे झाले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आदित्य आणि त्यांच्या भावंडांचे शिक्षण मराठवाड्यातील शिक्षणाचे माहेरघर असणारया योगेश्वरी शिक्षण संस्थेत पूर्ण झालं. त्यांचे वडील बसचालक असूनही त्यांनी मुलांच्या शिक्षणावर मेहनत घेतली.
बारावीपर्यंतचे शिक्षण अत्यंत कष्टाने पार पाडल्यानंतर मेडिकल प्रवेश परीक्षेत (सीईटी) डॉ.आदित्य यांनी यश मिळवून औरंगाबाद येथील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय येथून दंत चिकित्सक (बीडीएस ) ही पदवी २००९ साली पूर्ण केली.
दंत चिकित्सेचा अभ्यास करत असताना ‘आपण समाजाचे काही तरी देणे लागतो’ या भावनेतून आणि थोर समाजसेवक कै. बाबा आमटे आणि पदमश्री सिंधुताई (माई) सपकाळ यांच्या प्रेरणेतुन आदित्य आणि त्यांचे बंधु प्रदिप व बहीण राधिका यांनी सन २००८ साली “मानव परिवर्तन व विकास बहुउद्देशीय सेवा भावी संस्था” स्थापन केली.
या संस्थेच्या माध्यमातुन डाँ.आदित्य यांनी आज पर्यंत हजारो गरजु लोकांना जमेल तशी मदत पोहचवण्याचा प्रयत्न केला आणि भविष्यातही त्यांची ही निस्वार्थ सेवा चालू असणार आहे.
बीडीएस ची पदवी प्राप्त केल्यानंतर पुण्यातील नवी सांगवी येथे आदित्याज ऍडव्हान्स डेंटल हॉस्पीटल नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे डेंटल हॉस्पिटल उभारले आणि त्यामार्फत दंतचिकित्सा आणि रुग्णसेवा सुरु केली. या हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉ.आदित्य यांनी जागतिक पातळीवरील सर्व अत्याधुनिक रुग्ण सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केला आहे.
इतकचं नाही तर विविध देशात आयोजित केलेल्या दंतचित्कित्सा परिषदेत सहभाग घेऊन आपले शोधप्रबंध सादर केलेले आहे.
जसे कि २०१५ साली झालेली जर्मनी आणि दुबई येथील दंत चिकित्सा परिषद,
२०१६ साली इस्राईल आणि थायलंड, २०१७ साली कलोन जर्मनी, अमेरिका , स्वित्झर्लंड, २०१८ साली थायलंड आणि २०१९ साली कलोन जर्मनी , लंडन , दुबई , रोम ईटली इत्यादी ठिकाणी झालेल्या आंतरराष्ट्रीय दंतचिकित्सा परिषदेत डॉ. आदित्य मानाचे सहभागी ठरले आहेत.
मात्र यशाचे हे शिखर पाहण्यासाठी डॉ. आदित्य यांना सुरुवातीच्या काळात अतोनात कष्ट करावे लागले. घरची आर्थिक परिस्थिती सामान्य असल्यामुळे रुग्णसेवा करण्यासाठी त्यांना डेंटल चेअर, यंत्र आणि हॉस्पिटल उभारण्यासाठी पैसा हा प्रथमस्थानी होता. पण तारण ठेवण्यासाठी काहीही नसल्यामुळे डॉ. आदित्य यांच्या संघर्षाच्या काळात कुठल्याही बँकेने त्यांना मदत केली नाही. पिंपरी चिंचवड मधील जवळपास २५ बँकांचे पावसात भिजत डॉ. आदित्य यांनी कर्ज मंजूरीसाठी दारे ठोठावली. पण आदित्य यांना यश मिळालं नाही. मात्र यामुळे निराश न होता आदित्य यांनी प्रयत्न चालू ठेवले आणि आज डॉ आदित्य हे डेंटल कॅटेगिरी मधील सर्वाधिक कर भरणारे डॉक्टर म्हणून ओळखले जातात.
लंडन बुक ऑफ रेकॉर्ड यांनी गोल्डन बुक ऑफ रेकाँर्ड मध्ये याची आंतरराष्ट्रीय पटलावर नोंद केली आहे.
“कर्ज मंजूर न होण्यापासून ते सर्वाधिक कर भरणारा डॉक्टर…” हा डॉ. आदित्य यांचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. ज्या बँकांनी आदित्य यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांना कर्ज नाकारलं होतं, आज त्याच बँकांनी आदित्य यांना प्रमुख पाहुणे म्हणून बँकांच्या उद्घाटनासाठी बोलावण्यात आलं होतं.
भाड्याच्या तीनशे स्क्वेअर फुट जागेतून सुरुवात करत ते आज स्वतःच्या मालकीच्या २२०० स्क्वेअर फुट हॉस्पिटलचे ते संचालक आहेत. बारा कोटींची गुंतवणूक असणाऱ्या या हॉस्पिटलमध्ये जगातील अत्याधुनिक डेंटल यंत्रणांचा वापर रुग्णसेवेसाठी केला जातो. मराठी सिनेसृष्टी तसेच बॉलीवूड मधील काही नामवंत कलाकार व विविध देशातील नागरिक हे डॉ.आदित्य यांचे पेशंट आहेत.
मौखिक आरोग्य हेचं आपल संपूर्ण आरोग्य आहे. आपलं आरोग्य हे मौखिक स्वच्छतेवर अवलंबून असून आज जगातील ९९ टक्के लोकांना डेंटल केरीज या आजाराने ग्रासले आहे. त्यामुळे आपण दर तीन महिन्याला डॉक्टरांकडे जाऊन दातांची तपासणी करणे खूप गरजेचं आहे. मानवी शरीराची रचना अशी आहे की, हाड झिजलं तर ते पुन्हा तयार होतं, त्वचा खरचटली गेली तर पुन्हा पहिल्या सारखी होते, मात्र जर दातांवर असणार इनेमल म्हणजेचं दातांवर असणार नैसर्गिक आवरण गेलं, तर ते पुन्हा आपल्या शरीरात कधीही तयार होऊ शकत नाही. त्यामुळे दातांची निगा राखणे हे प्रत्येकाचं प्रथम कर्तव्य आहे असा उपदेश डॉ. आदित्य यांनी डॉक्टर्स डे निमित्त सर्वांना केला आहे.
आदित्य डेंटल हॉस्पिटलचे वैशिष्ट्य म्हणजे खराब झालेले दात जे वाचण्यायोग्य असतील अशा दातांना लेझर पध्दतीने रुट कँनल करुन वाचवणे , वेडे-वाकडे दात सरळ करण्यासाठी ओर्थोडॉन्टिक ट्रिटमेंट किंवा ब्रेसेसची ट्रिटमेंट, दातांचे सौंदर्य वाढविण्यासाठी स्माईल डिझायनिंग, बँडब्रीथ किंवा तोंडाचा वास येत असेल तर त्यासाठी ट्रिटमेंट, याशिवाय काढलेले दात किंवा पडलेल्या दातांच्या ठिकाणी दंतरोपन (डेंटल इंप्लान्ट करण्यात ते नावाजलेले आहे. आपल्या जबड्यामध्ये एकुन ३२ दात असतात. त्या पैकी २८ दातांचाचं आपल्या जेवणामध्ये उपयोग होतो. या २८ दातांची नैसर्गिकरित्या एक प्रकारची विशिष्ट ठेवण असते. दात काढावा लागला किंवा पडला तर त्या दाताच्या जागेवर नवीन कृत्रिम दात बसवणे गरजेचे असते.
डॉ. आदित्य पतकराव यांचं दंतचिकित्सा आणि रुग्णसेवा क्षेत्रातील योगदान पाहता त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना २०१५ चा नॅशनल डेंटल एक्सलेंस अवॉर्ड, २०१६ चा प्रोफेशनल आयकॉन ऑफ पुणे अवॉर्ड,
२०१७ चा इंडियन डेंटल अवॉर्ड, २०१७ चा नॅशनल डेंटल एक्सलेंस अवॉर्ड, २०१७ चा इंटरनॅशनल सॉक्रेटिस अवॉर्ड स्वित्झर्लंड, २०१८ चा इंटरनॅशनल एक्सलेंस अवॉर्ड माधुरी दीक्षित यांच्या हस्ते, २०१८ चा महाराष्ट्र गौरव पुरस्कार, २०१८ चा नाथ पुरस्कार,२०१९ ब्रिटिश पार्लमेंटचा एक्सलेंस अवॉर्ड, २०२१ चा ग्लोबल आयकॉन ऑफ इंडिया ॲवार्ड, २०२१ लुम्बिनी नेपाळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल अवॉर्ड, २०२१ चा पुणे हेल्थ आयकॉन्स पुरस्कार, २०२१ चा राष्ट्रीय युथ आयकॉन्स अवॉर्ड, नवी दिल्ली,आणि २०२१ वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन
आणि 2022 चा दुबई येथील अलझारुणी फाँऊडेशनचा पुरस्कार इत्यादी पुरस्कारांचे डॉ. आदित्य पतकराव मानकरी आहेत.
या वर्षीचा बेस्ट सिलिब्रेटी डेटिंस्ट म्हणुन त्यांची लंडन येथील डेंटल आँस्कर पुरस्कारासाठी सर्वाधिक मताधिक्यांनी निवड झाली आहे, या वर्षी डेंटल आँस्कर भारतात होणार आहे, हा पुरस्कार भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडु यांचे हस्ते लवकरच मिळणार आहे.
याची माहिती मिळाल्यावर डाॅ. आदित्य यांना सोशल मिडीया आणि प्रत्यक्ष भेटुन हजारोंच्या संख्येने त्यांचे अभिनंदन केले आहे,त्यांच्यासंगे बोलताना त्यांनी एक महत्वाचा सल्ला दिला कि
प्रत्येक तीन महिन्यामध्ये आपले मौखिक आरोग्य दंतवैद्याकडे जाऊन तपासुन घेणे आवश्यक आहे.
तुम्हाला ही तुमचे मौखिक आरोग्य अधिक सुंदर बनवायचे असेल तर असेल तर डॉ.आदित्य यांच्या हॉस्पिटल ला नक्की भेट द्या.
डॉ. आदित्य पतकराव
Mob.: 9970017721
Hospital – 6232212121
Comments are closed