उघड्यावर कचरा टाकणारे व जाळणाऱ्यांसाठी सावधानतेचा इशारा.
पिंपरी चिंचवड शहरातील उपनगरातही मोठ्या प्रमाणावर टाकला जातोय उघड्यावर कचरा तर अनेक ठिकाणी कचरा जाळल्याने परिसरात निघतात धुराचे लोट.
पिंपरी, दि. २२( punetoday9news):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत आरोग्य विभागाच्या वतीने कचरा जाळणाऱ्या व कचरा टाकणाऱ्या कंपनीवरती दंडात्मक कारवाई करून सुमारे पाच हजार दंड वसूल केला आहे.

उघड्यावर कचरा जाळल्याने कारवाई करताना महानगरपालिकेचे अधिकारी.
सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी मधील श्री विश्वकर्मा इंटरप्राईजेस या कंपनी वरती दंडात्मक कार्यवाही करण्यात आली यात सहाय्यक आरोग्य अधिकारी बाबासाहेब कांबळे मुख्य आरोग्य निरीक्षक शांताराम माने आरोग्य निरीक्षक लक्ष्मण साळवे यांनी सहभाग घेतला.

Comments are closed