धनत्रयोदिशीच्या निमित्ताने नागरिक मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करतात पण अनेकदा महत्त्वाची माहिती नसल्याने फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे सोने खरेदी करताना खालील माहिती अवश्य वाचा.
सोने खरेदी करताना हॉलमार्क पाहा
सोने खरेदी करण्यापूर्वी त्यावर असलेले हॉलमार्क तपासावे. हॉलमार्क हा सोन्याच्या शुद्धतेचे प्रमाण देते . त्याशिवाय , ज्वेलर्स सोन्यावर असलेले स्टॅम्पिंग आदींबाबींकडे लक्ष देणे आवश्यक आहे . सोन्याची किंमत तपासा सोन्याच्या दरात चढ – उतार होत असतात . त्यामुळे दुकानात जाऊन सोने खरेदी करण्याआधी तुम्ही तुमच्या शहरातील सोन्याची किंमत तपासून घ्या .
तुम्ही सोने हे किती कॅरेटचे खरेदी करत आहात?
याकडे लक्ष द्यावे . 24 कॅरेटचे सोने हे सगळ्यात शुद्ध आणि महाग असते . साधारणपणे ज्वेलरी 22 कॅरेट सोन्याची असते . घडणावळ ( मेकिंग चार्ज ) किती ? सोने खरेदी करताना तुम्ही ज्वेलर्सच्या घडणावळ अर्थात मेकिंग चार्जकडेही लक्ष द्या . हे चार्जेस प्रत्येक स्टोअरनुसार वेगवेगळे असतात . त्यामुळे तुम्ही ज्या ज्वेलर्सकडून दागिने खरेदी करत आहात , तिथे बाजारातील शुल्कापेक्षा अधिक आकारणी होत नाही ना , हेदेखील पाहा . रोखीने खरेदी टाळा दागिने खरेदी करताना अनेकजण रोखीने व्यवहार करतात . मात्र , शक्यतो रोखीचा व्यवहार टाळावा . दागिने खरेदी करण्यासाठी तुम्ही क्रेडिट अथवा डेबिट कार्डचा वापर करावा.
दागिने खरेदी केल्यानंतर त्याची पावती न विसरता घ्यावी.
विश्वासू ज्वेलर्सकडून करा खरेदी दागिने खरेदी करताना नेहमी चांगल्या , विश्वसनीय आणि परिचयातील दुकानातून दागिने खरेदी करा . त्यामुळे तुमची फसवणूक होण्याचा धोका कमी असतो .
Comments are closed