पिंपरी (punetoday9news):- स्वाभिमानी चर्मकार महासंघाच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्षपदी अरविंद गायकवाड यांची नियुक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकिरण घोलप यांच्या आदेशानुसार करण्यात आली .
यावेळी राष्ट्रीय महासचिव गोरख ननवरे व प्रदेश युवक अध्यक्ष विकास तिखे व कार्यकर्ते उपस्थित होते .
यावेळी गायकवाड म्हणाले की,”संघटना वाढीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येतील लवकरात लवकर शहरामधील समाजाविषयी आपुलकी ,तळमळ व जाणीव असणाऱ्या बांधवांशी संपर्क करुन संघटन मजबूत केले जाईल तसेच समाजातील अडीअडचणी सोडविण्यासाठी कायम प्रयत्नशील राहील. ”
नियुक्ती बद्दल समाज बांधव व कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.
Comments are closed