पुणे, दि.१( punetoday9news):- सहकार आणि लेखा विषयात पदविका (जी.डी.सी.अँड ए.) व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम.) परीक्षा २०२२ चा निकाल घोषित करण्यात आला असून फेरगुण मोजणीकरीता https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ३१ डिसेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे.

परीक्षार्थींना हा निकाल https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर लॉगीन व पासवर्डचा उपयोग करुन पाहता येईल. तसेच https://sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील महत्वाचे दुवे मधील ‘जी.डी.सी. ॲण्ड ए. मंडळ’ या टॅबवर थेट पाहता येणार आहे.

फेरगुणमोजणीचे शुल्क भारतीय स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेत प्रत्येक विषयासाठी ७५ रुपये अधिक बँक शुल्क याप्रमाणे चलनाद्वारे भरावे. बँकेचे चलन ऑनलाईन प्राप्त करून घेण्याची मुदत त्याच दिवशी रात्री २२.३० पर्यंत राहणार आहे. चलन बँकेत ३ जानेवारी २०२३ (बँकेचे कामकाजाचे वेळेत) पर्यंत भरणा करण्यात येईल. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जावर विचार करण्यात येणार नाही, असेही जी.डी.सी. ॲण्ड ए बोर्डच्या सचिवांनी कळविले आहे.

 

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!