पिंपरी दि.२२( punetoday9news):- पिंपरी चिंचवड मधील गर्दीच्या ठिकाणी  व्यक्तींचा परस्परांशी प्रत्यक्ष संपर्क कमी करणे, हा कोविड-१९ विरुद्ध लढ्यामधील एक महत्त्वपूर्ण घटक आहे.
कोरोनायोद्ध्यांच्या संरक्षणासाठी, पिंपरी चिंचवड
महानगरपालिकेच्या वतीने झोपडपट्ट्यांच्या परिसरामध्ये कोविड-१९ च्या संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन होत आहे का ? यावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचा उपयोग करण्यात येत आहे. ड्रोनमुळे पोलिसांना नागरिकांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आणि कोविड-१९ शी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना ओळखणे शक्य होणार आहे.

 

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!