विदर्भ माळी युवा संघाच्या बाल कलाकारांच्या कलेला दाद…!
इंद्रायणीनगर , दि. ९ :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती सोहळ्यानिमित्त भोसरीतील विदर्भ माळी युवा संघातर्फे संत गजानन महाराज मंदिरातील सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी वर्षा बोचरे, सुचिता वानखडे, वर्षा तायडे, अपर्णा भड, सुचिता तायडे यांच्या हस्ते दिपपूजन व प्रतिमा पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तर सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात प्रसन्न बोचरे व सोहम सन्नीसे या बालकलाकारांच्या गणेश वंदना व स्वागत गीताने झाली. यानंतर सोशल मीडियावर आधारित छोटी नाटिका आदित्य जुमडे ने सादर करीत त्याचे गांभीर्य लक्षात आणून दिले. तर स्वरा अत्तरकार हिने सावित्रीबाई फुलेंवर केलेली कविता आपल्या शैलीत गाऊन दाखवली. पियुष भड व वीरा राऊत यांनी सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या कार्यावर आपले बोबडे बोल व्यक्त केले.
आपल्या कणखर व पहाडी आवाजात
छत्रपती शिवाजी महाराजांवर दिलेल्या भाषणात श्रेयस रहाटे याने उपस्थितांची दाद मिळवली. तर बालकलाकार काव्या राऊत हिने साकारलेल्या होय, मी सावित्री बोलतेय या एकपात्री प्रयोगाच्या भूमिकेतून सावित्रीबाई फुले यांचा जीवनसंघर्ष प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभा केला.
गुरु वंदना श्रीराज बोंबटकार, शर्वरी बोंबटकार, पसायदान गायन सौम्य शेवलकार, तबला वादन गोपाल बोचरे, हेमंत राऊत यांनी आपली कला सादर केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपेक्षा शेवलकार व सचिन शेवलकार, प्रास्ताविक संदिप राऊत, अहवाल वाचन गणेश वानखडे, मोहन भड तर आभार गोपाल बोचरे व धनंजय बगाडे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा संघाचे अध्यक्ष योगेश गाडगे, गिरीश बोदडे, ज्ञानेश्वर बोचरे, संजय राऊत, दामोदर भड, राम सन्नीसे, संजय तायडे, मोहन राऊत, गणेश बोंबटकार, गणेश निखाडे, अंकुश राऊत, विजय अढाऊ, प्रदीप निखाडे, प्रकाश खडके, वसंत अत्तरकार,योगेश बगाडे विलास गिऱ्हे, विनोद देवकर, श्रीकांत अढाऊ, नितीन निमकर्डे, मंगेश देशमुख, अनिल अटाळकर,गजानन बोदडे यांनी परिश्रम घेतले.
Comments are closed