वॉशिंग्टन, २६ जुलै (punetoday9news) अमेरिकेच्या एका कोर्टाने २००८ साली मुंबई दहशतवादी हल्ल्यात भाग घेतल्याप्रकरणी भारत सरकारने फरार आरोपी म्हणून घोषित केलेला मुळचा पाकिस्तानी असलेला कॅनेडियन व्यावसायिक ताहाव्वुर राणा याची जामीन याचिका फेटाळली आहे.
 डेव्हिड कोलमन हेडलीचे बालपणातील मित्र राणा (५९) याना २००८ मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या प्रकरणात भारताच्या स्वाधीन करण्याच्या विनंतीवरून लॉस एंजेलिसमध्ये पुन्हा दहा जून रोजी पुन्हा अटक करण्यात आली आहे.  या हल्ल्यात सहा अमेरिकन लोकांसह १६६ लोक ठार झाले होते . भारतात त्याला फरारी गुन्हेगार म्हणून घोषित केले आहे.
२१ जुलै रोजी २४ पानांच्या आदेशात लॉस एंजेलिसमधील अमेरिकेच्या जिल्हा कोर्टाच्या न्यायाधीश जॅकलिन चुलझियान यांनी राणाला जामीन नाकारत त्याचा फरार होण्याचा धोका असल्याचा दावा केला आहे.

Comments are closed

error: Content is protected !!