पिंपरी, दि.१५ :- महावितरणच्या पिंपरी विभागातील कार्यरत व बदली होवून इतरत्र गेलेल्या सर्व कर्मचारी व अधिकारी यांच्या सहकार्याने जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना अल्पोपहार वाटप करण्यात आले.
यावेळी महावितरणच्या वतीने पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार, अधीक्षक अभियंता संजीव राठोड , कार्यकारी अभियंते भोसले व साळी साहेब, शिवाजी शिवनेचारी व सर्व अधिकारी, अभियंते, कर्मचारी यांनी वैष्णवांचे स्वागत केले व सर्वांच्या हस्ते दिंडीतील वारकऱ्यांना चिवडा व बुंदीच्या 20 हजार पॅकेटांचे वाटप करून वारकरी बांधवांची सेवा करण्यात आली.
महावितरण कडून दिंडी प्रमुखांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.
विशेष म्हणजे महावितरण चेच कर्मचारी असलेले दिलीप गायकवाड वरिष्ठ यंत्र चालक आणि पिंपरी कॅम्प शाखा कार्यालय चे सहायक अभियंता उगले यांनी आपल्या सुश्राव्य गाण्याने सर्व वारकऱ्यांचे आणि दिंडीचे अभंग आणि भारुड गाऊन स्वागत केलं आणि सर्व भाविक भक्तांना वीज बिल वेळेत भरण्यासाठी आवाहन करतानाच विजेचे काम सुरक्षित रित्या करण्याच्या सूचना दिल्या.
वारकरी बांधवांसाठी अल्पोपहार तयार करण्याच काम गेली 18 वर्षे शिवाजी शिवनेचारी यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी विभागातील कर्मचारी यांनी आपले दैनंदिन कामकाज सांभाळून मागील 8 दिवसांपासून स्वतः 20 हजार चिवडा पॅकेट तयार केली गेली.
अल्पोपहार तयार करण्यासाठी संदीप साळुंखे, रमेश घणवट, विकास लडकत, सचिन शेरकर, पटोरकर, आनंद जाधव, लोखंडे, रवींद्र आमले, संदीप खळदकर, बागुल, खताळ , अमोल ड्रायवर आणि कासारवाडी व दापोडी शाखेतील पूर्ण स्टाफ व पिंपरी विभागातून प्रसाद पॅकिंग साठी आलेले सर्व कर्मचारी अधिकारी यांचे विशेष सहकार्य केले.
Comments are closed