शिक्षण आणि संस्कार.
संस्कार काळाची गरज आहे. संस्कारामुळे आयुष्याला वळण मिळते. शिक्षण घेतले म्हणजे संस्कार रुजतीलच असे नाही तर ते रुजवावे लागतात. खऱ्या संस्काराची सुरुवात घरापासून होते. तसेच शाळा परिसर हे सुध्दा संस्काराचची केंद्रे आहेत.
प्रथम बालकावर संस्कार कुटुंबाकडून होतात. आजी-आजोबा हे तर जुन्या पिढीतील संस्काराचे व्यासपीठ होते. विशेषत: आजीबाई, आजीचा बटवा उघडला की त्यातुन खजिना बाहेर पडत असे. बटव्यात गोष्टी असत, विनोद असत, नकला असत, जात्यावरच्या ओव्या असत, बडबडगीते व गाणी असत. आजी शिक्षक व कलाकार या सर्व भूमिका शानदार वटवीत असे. आजच्या पिढीला अशा आजी, आजोबांची कमतरता जाणवत आहे. आईची भूमिका पण बालकाच्या जडणघडणीत महत्वाची असते. आईचे स्थान बालकाच्या आयुष्यात फार महत्त्वाचे असते. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करावा असे संस्कार आई सहजपणी बालकावर रुजवत असते. वडील बाहेरील परिस्थाती ची व गरिबीची, काटकसरीची, व्यवहाराची जाणीव प्रसंगानुरूप करून देतात. म्हणूनच कुटंब बालाकाच्या संस्काराचा पाया आहे..
पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ५० हजार कोटींचे पूल उभारणार – नितीन गडकरी
स्केल्स अँड टेल्स वाईल्डलाईफ ऍनिमल रेस्क्यू फाउंडेशन कडून दहा दिवसांत ३ कासवांना जीवदान.
होंडा कार्स इंडिया’ने पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू केली गारवे होंडा’ची नवीन डीलरशिप
मुलांवर परिसरातून ही सहज संस्कार घडत असतात. परिसरातील वस्ती, गाव, संस्कृती यामधून चांगल्या वाईट गोष्टी तो शिकतो. लहान असल्याने चांगले काय वाईट काय याची जाणीव त्याला नसते, म्हणून घरातील व्यक्तींचे त्यांच्यावर लक्ष हवे. मुले बाहेरील घडलेली घटना कुटुंबातील व्यक्तीना सांगत असतात त्यावेळी तो जे काही सांगत आहे हे आपण लक्षपूर्वक ऐकले पाहिजे, त्याकडे आपण दुर्लक्ष केले तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. म्हणून तो जे काही सांगत आहे हे आपण ऐकून त्यावर चांगले काय, वाईट काय याचा उपदेश समजपूर्वक न रागावता समजून सांगितले तर संस्काराची पालवी फुटायला नक्कीच सुरुवात होईल.
संस्काराचे मंदीर म्हणजे मराठी शाळा. मुल आईचे बोट धरून या मंदीरात पाऊल ठेवते तेंव्हा खऱ्या अर्थाने संस्कार व शिक्षण दोन्ही एकत्र सुरू होते. आता मुल विद्यार्थी झालेले असते. सरस्वतीच्या मंदीरात गुरुजानाच्या मार्गदर्शनाखाली संस्काराचा वटवृक्ष बहरायला सुरुवात होते. शिस्त आज्ञाधारकपणा, देशप्रेम, बंधुभाऊ संवेदनशील, सभाधीटपणा या गुणांचा, इतर मुल्यांचा परिपाक होऊन संस्काराची मुळे घट्ट रुजतात. मुले शाळेतील घटाना, प्रसंग गुरुजांनी काय शिकवले अभ्यास किती दिला सर्व काही पालकाला सांगत असतो. अशी वेळी आपण मुळांसाठी वेळ दिला पाहिजे, शिक्षकांविषयी आदाराची भावना मुलाच्या मनात कशी निर्माण होईल यासाठी पालकांनी सुद्धा प्रयत्न कारायला हवा. मुलाची प्रगती, वागणूक याविषयी गुरुजनांची भेट घेऊन जाणून घेतले पाहिजे,
संस्कार आज काळाची गरज आहे. बालपणी जिजामातेने संस्काराची बीजे रुजवल्यामुळे छत्रपती शिवाजीमहाराज घडले. रयतेचे स्वराज्य निर्माण झाले. श्यामच्या आईने श्यामवर उतम संस्कार केले. म्हणून महाराष्ट्रला संवेदन शील मनाचे साने गुरुजी मिळाले. मुलांचा सन्मान केला तर मुले तुमचे अनुकरण करतील, ते सुद्धा विनयशील होतील व वडीलधा-याचा, गुरुजनांचा आदर सन्मान करतील. परिणामी एक संकारक्षम पिढी तयार होईल..
मुलांच्या संस्कारासाठी पालकांनी एवढे करा…….
१. घरात ग्रंथालय तयार करा पुस्तकांचे वाचन करायला लावा.
२. स्वतः ची कामे स्वतः करायला शिकवा.
३. मोबाईल, टीवी चा वापर संस्कारक्षम चित्रपट, गाणी दाखविण्यासाठी करा.
४. दररोज हात पाय धुवून देवाचा दिवा लावणे, प्रार्थना, आरती, भजन, अभंग, हनुमान चालीसा, मनाचे श्लोक म्हणायला लावणे.
५. मुले बरोबर असतांना नेहमी खरे बोला. त्यांना सन्मानाने वागवा.
६. मुलांना सहीच्या दिवशी तुमच्या व्यवसारामधील छोटी मोठी कामे करण्याची सवय लावा व्यावहारीक कृतीतून सहज शिक्षण घ्या.
गणेश भगवान राऊत ( उपशिक्षक, पुणे मनपा )
पासवर्ड विसरलात? चिंता नको पासवर्ड शोधण्याची सोपी ट्रिक.
‘आभा’ कार्डसाठी अशी करा नोंदणी.
Comments are closed