जेजुरी,दि.१० :- पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथील शरदचंद्र पवार महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी मेळावा संपन्न झाला. माजी विद्यार्थी महाविद्यालयाची संपत्ती असते. हे विद्यार्थी आजी विद्यार्थ्यांना वेळ, ज्ञान आणि आर्थिक मदत करुन एका अर्थाने सामाजिक आणि शैक्षणिक जबाबदारी पार पाडू शकतात. महाविद्यालयाच्या विकासात आणि प्रगतीत मोठे योगदान देऊ शकतात. महाविद्यालयाच्या नॅक मूल्यांकनातही माजी विद्यार्थ्यांची नक्कीच मदत होऊ शकते. या महाविद्यालयाचे विद्यार्थी विविध क्षेत्रांत यशस्वी झाल्याचे पाहून समाधान वाटले, असे विचार सहसंचालक डॉ. किरणकुमार बोंदर यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानच्या जेजुरी येथील शरदचंद्र पवार महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष विजय कोलते, प्रमुख पाहुणे सहसंचालक डॉ. किरणकुमार बोंदर, सचिन डांगे, विश्वस्त माई कोलते, सहसचिव बंडूकाका जगताप, प्राचार्य डॉ. बालाजी नाटकरे, मेळाव्याच्या समन्वयक उपप्राचार्य प्रा. डॉ. बेबी कोलते, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल सोनवणे, उपाध्यक्ष शिवाजी राणे, ए.पी.आय. स्वाती शिंदे पी. एस. आय. प्रमोद हंबीर डॉ. धनाजी नागणे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

अध्यक्षीय मनोगत करताना व्यक्त विजय कोलते म्हणाले महाविद्यालयातून शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी समाजाच्या विविध क्षेत्रात आज यशस्वीपणे काम करीत आहेत. त्यांनी व्यक्त केलेल्या मनोगतातून प्राध्यापक, पीएसआय सहसंचालक, शिक्षक पोलीस, उद्योजक, पत्रकार, बँक अधिकारी, सेवाभावी संस्थेत काम करणारे, आणि शेती करणारे विद्यार्थी आहेत. या परिसरात पदवी शिक्षणाची गैरसोय असल्याने शरद पवार यांनी येथे महाविद्यालय उभारण्याची सूचना केली व त्यानुसार आपण महाविद्यालय स्थापन केले असे त्यांनी सांगितले.

 

ते म्हणाले, हे महाविद्यालय अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला संघर्षाला तोंड देत उभे केले. पण आज हे विद्यार्थी मोठे झाल्याचे पाहून जो आनंद वाटतो आहे तो शब्दात सांगता येत नाही. आनंदी जीवनाचे खरे शिक्षण महाविद्यालयीन जीवनातच मिळते. सामाजिक जबाबदारी घेऊन आपण काम केल्यास उद्याची नवीन पिढी निर्माण होऊ शकते. संस्था पुढील वर्षापासून एम कॉम., बी.बी.ए… यांसारखे कोर्सेस सुरू करीत आहे. त्याचा निश्चित फायदा या परिसरातील विद्यार्थ्यांना होईल. महाविद्यालयाचा निसर्गरम्य व ऐतिहासिक परिसर नेहमीच तुम्हांला ऊर्जा आणि प्रेरणा देत राहिल त्यामुळे आपण सतत महाविद्यालयात येत राहा, असे आवाहन कोलते यांनी याप्रसंगी केले.

यशस्वी झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार विजय कोलते आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी बंडू काका जगताप, माई कोलते, स्वाती शिंदे, प्रमोद हंबीर, दिनेश जाधव, डॉ. किरण गाढवे, डॉ. सचिन जगताप, मेघा कामथे, अक्षय चाचर, तृप्ती ढवळे, ज्योती खैरे, शिरीष चाचर किशोरी नलावडे, डॉ. अर्चना भुजबळ, सागर झगडे, शिवाजी राणे, योगेश राणे, निलेश गार्डी, पवार या विद्यार्थ्यांनी महाविद्यालय, प्राध्यापक, या  विषयीच्या आठवणींना उजाळा देऊन हा मेळावा पुढील वर्षापासून आजी विद्यार्थ्यासोबत घेण्यात यावा अशा प्रकारची अशा प्रकारची सूचना केली.

संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल सोनवणे यांनी अहवाल वाचन व मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. बेबी कोलते यांनी, सूत्रसंचालन प्रा. संतोष तांबे यांनी तर आभार प्रा. किशोरी ताकवले यांनी मानले. कार्यक्रमास विविध ठिकाणाहून माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

 


 

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!