महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबईचा उच्चस्त पुरस्कार.
पिंपरी,दि.१७ :- लिंगायत धर्म महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उद्योजक आर एस देशिंगे यांना सामाजिक कार्यातील उल्लेखनीय कामगिरी बाबत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई यांच्या वतीने देण्यात येणारा आणि उच्चस्त असणारा भारत भूषण पुरस्कार खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या शुभ हस्ते देण्यात आला.
या प्रसंगी असंघटित कामगारांचे नेते समाजसेवक बाबा आढाव, भोसरी मतदार संघाचे आमदार महेश लांडगे,आमदार बच्चू कडू,आमदार उमा खापरे,राजकीय विश्लेषक उदय निरगुडकर, ज्येष्ठ लेखक अरविंद जगताप तसेच ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले, महेश म्हात्रे,मंदार फणसे, आशिष जाधव, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर,माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे,शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन भुजबळ, वैभव स्वामी,संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे,प्रदेश सरचिटणीस डॉ.विश्वास आरोटे,उपाध्यक्ष नितीन शिंदे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पराग कुंकुलोळ,उपाध्यक्ष अतुल क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.
महात्मा बसवेश्वर महाराजांनी अनुभव मंटपच्या माध्यमातून लोकशाही रुजविण्याचे अत्यंत महत्वाचे काम बाराव्या शतकात केले.सच्चे समाजसुधारक म्हणून बसवेश्वर महाराजांची जनमानसात ख्याती होती. त्यांनी निर्गुण, निराकार, एकेश्वरवादी श्रद्धेचा पुरस्कार केला.हेच विचार जनमानसा पर्यंत पोहचविण्याचे काम देशिंगे करीत आहेत त्यामुळे या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे असे आपल्या मनोगतात महाराष्ट्र राज्य मराठी मुंबई संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी सांगितले.
Comments are closed