पिंपरी, दि.४ ( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव मधील मोरया पार्क येथे एका डंपरने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे दुचाकीवर मागे बसलेली मुलगी डंपरच्या मागच्या चाकाखाली पडली तिच्या तोंडावरून डंपरचे चाक गेल्याने ती जागेवरच मरण पावली.
संजय साफरीया व त्यांची मुलगी (रा. चिखली) दोघे जण पिंपळे गुरव येथील मोरया पार्क मधील भरत परमार यांचेकडे आले होते. सायंकाळी सहाच्या सुमारास संजय साफरीया व मुलगी विभूती साफरिया दुचाकीवरुन चिखलीला निघाले असता मोरया पार्क येथील मेन रोडवर येताच डंपरने धडक दिल्यामुळे मागे बसलेल्या विभूती साफरिया ( वय १३) ही डंपरच्या मागच्या चाकाखाली आल्याने तिच्या चेहऱ्यावरून चाक गेले. त्यामुळे विभूतीचा जागेवरच मृत्यू झाला. डंपरसह  चालकास सांगवी पोलीस चौकीत नेले आहे.
घटनास्थळी सांगवी पोलीस दाखल होते. अचानक घडलेल्या दुुुर्घटनेमुुुळे काही काळ रस्ता वाहतुकिसाठी बंद करण्यात आला होता.

या प्रकरणी सांगवी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय मुळीग, उपनिरीक्षक गोविंद चव्हाण अधिक तपास करीत आहेत.

Comments are closed

error: Content is protected !!