पिंपरी,दि.७( punetoday9news):- महाराष्ट्रातील गडकिल्यांची पडझड व संवर्धन हा मोठा चर्चेचा विषय आहे. आपल्या पुर्वजांच्या इतिहासाचे साक्षीदार असलेले गडकिल्ले हे पुनर्बांधणी च्या संवर्धनाच्या प्रतिक्षेत आहेत. रायगड चा अपवाद वगळता कित्येक ठिकाणी डागडुजी करणे गरजेचे आहे. याच धर्तीवर खासदार अमोल कोल्हे यांनी ट्विट करून काही किल्यांची झालेली पडझड दाखवून शिवप्रेमिंना व पुरातत्व खात्याला लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे.

अमोल कोल्हे यांनी ट्विट करून असे सांगितले आहे की “ज्यांच्यामुळे मंदिरात देव राहिला त्या माणसातून देवत्वाला पोहोचलेल्या छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची मंदिरं अर्थात महाराष्ट्रातील गडकिल्ले यांची मोठ्या प्रमाणावर पडझड होत आहे..शिवप्रेमींसाठी हेच मंदिर आणि हीच आस्था! पुरातत्व खात्याने लक्ष घालून तात्काळ दुरूस्त व संवर्धन करावे.”

 


Comments are closed

error: Content is protected !!