पिंपरी,दि.4 :- अखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाज पुणे आयोजीत उपवर ओळख परिचय संमेलन-२०२५ चे काळेवाडी येथे संपन्न झाले. पिंपरी चिंचवड येथे प्रथमच उप वर व उप वधू विवाह उत्सुक एकाच वेळी, एकाच मंचावर उप-वधू व पालकांना बघता यावे यासाठी सदर मेळावा हा लाड शाखीय वाणी समाज यांच्या तर्फे शहरात प्रथमच घेण्यात आला.

यावेळी उपवर व उपवधू यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. सदर वधूवर मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी चिंचवड भाजप जिल्हा कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे, लाडशाखीय वाणी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष मनोज ब्राह्मणकर , परिचय मेळाव्याचे अध्यक्ष राजेंद्र महालपुरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला, यावेळी कार्याध्यक्ष
दगडू पाटील, उपाध्यक्ष नीतीन देव, नितीन वाणी, सचिव किशोर ब्राह्मणकर, मनीष शिरुडे, सोपान पितृभक्त, संजय भामरे,
योगेश चिंचोले, स्वप्नील कोतकर, दिलीप कोठावदे, सुरेश वाणी, आनंद येवले, राजेंद्र सारंगे, अतुल फूलदेवरे, दिनकर तरवटे, जयेश देव, चंद्रकांत बहाळकर, रवींद्र येवले, पवन बहाळकर, प्रदीप शेंडे, प्रमोद शिरोडे, अमोल मराठे, दिनेश पाटे, गोकुळ सोनजे , तुषार कोठावदे, मिलिंद नानकर, योगेश मोराणकर, नितीन देव, मिलिंद वाणी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलतांना पिंपरी चिंचवड शहराचे भाजपा अध्यक्ष शत्रुघ्न काटे म्हणाले की वधू-वर परिचय मेळावे हे काळाची गरज आहे , या माध्यमातून वेळ आणि पैशांची बचत होवुन विवाह निश्चितचे काम होते. ही बाब अतिशय कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन केले तर कार्यक्रमाचे मार्गदर्शक मनोज ब्राम्हणकार यांनी समाजातील वाढते घटस्फोट , कुटूंबामध्ये आईचा हस्तक्षेप, मध्यस्थींची भुमिका , मुला-मुलींच्या वाढत्या अपेक्षा व दुरावत चाललेली समाज संस्कृती यावर आपले प्रखर मत व्यक्त केले.या उप वर आणि उप वधू मेळाव्यात ३२७ उपवर व ३०९ उपवधू उपस्थितांसह संपुर्ण महाराष्ट्रातून पाल्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिसरातील सर्व सामाजिक संस्था व पदाधिकारी यांनी हातभार लाभला संजय भामरे व प्रा.विजय बागडे यांनी सुत्रसंचलन केले व मनिष शिरुडे, अतुल फुलदेवरे व दगडु पाटिल यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!