संगणकाबरोबर सांगवी परिसर महेश मंडळाने संगणक कक्षास कार्पेट, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी स्टूल, कपाटे, शास्त्र प्रयोगशाळे करिता लागणारे साहित्यही भेट दिले.
पिंपळे गुरव :- ‘शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी … ग्रंथ हेच गुरु … शिकाल तर जगाल’ हे उद्दिष्ट ठेवून सांगवी परिसर महेश मंडळ व कोहेसिटी व्हेरिटास सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने परिसरातील शाळांना संगणक व शालेय साधनांचे वाटप करण्यात आले. सांगवीतील नृसिंह हायस्कूल, व कासारवाडी येथील ज्ञानराज विद्यालयास अदयावत सोलर ऊर्जा संच सहित व अद्यावत विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज सांस्कृतिक सभागृह, विद्यार्थांसाठी पेय जल सुविधा, तर पिंपळे गुरव येथील सरस्वती भुवन इंग्लिश शाळेला अद्यावत संगणक कक्ष व १० अत्याधुनिक संगणक, चिंचवड येथील श्रीमती कोंडाबाई गोलांडे प्राथमिक विद्यालयास १५ संगणक व विज्ञान प्रयोगशाळेचे साहित्य देण्यात आले.
हे जुनी सांगवी येथील मराठी प्राथमिक शाळेला अंदाजे १००० पुस्तके ग्रंथालयासाठी देण्यात आली. या अद्यावत संगणक कक्षाचे उद्घाटन कंपनीचे अधिकारी विजय म्हसकर, संजय माथुर, अभिजीत देसाई, शैलेश परुळेकर आदीच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
या वेळी कंपनीचे , सहेली दासवानी, फरीदुद्दीन शेख, अश्विन आपटे, धनंजय संकपाळ सांगवी परिसर महेश मंडळाचे अध्यक्ष सत्यनारायण बांगड , सतीश लोहिया, मुकुंद तापडिया आणि महेश मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
विजय म्हसकर म्हणाले, ” सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या मुलांसाठी चालणाऱ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा पुरवल्या गेल्या तर असे विद्यार्थी चांगले शिक्षण घेऊन भविष्यात त्यांचे जीवनमान उंचवू शकतात. त्यामुळेच आमची कंपनी असे शैक्षणिक उपक्रम राबवत असते.
सतीश लोहिया म्हणाले कि ” सांगवी परिसर महेश मंडळाच्या वतीने समाजभिमुख उपक्रम जसे की शालेय शैक्षणिक साहित्य वाटप, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबीर वर्षभर राबविले जातात. मागील सात वर्षापासून आम्ही कोहेसिटी व्हेरिटास कंपनीच्या सहकार्याने शाळांना मदत करत आलो आहोत. “
या प्रसंगी नृसिंह प्रशालेचे अशोक संकपाळ, ज्ञानराज विद्यालयाच्या सौ उर्मिला थोरात, सरस्वती भुवन इंग्लिश विद्यालयाच्या जागृती धर्माधिकारी, मराठी प्राथमिक शाळेच्या सौ कल्पना सोनवणे आणि शिक्षक वर्ग यांनी या साहित्याचा स्वीकार केला .
Comments are closed