पुणे दि. २० : महिला व बाल विकास विभागाच्या वतीने पुणे जिल्ह्यासाठी ४ हजार महिलांना “पिंक ई- रिक्षा ” वाटप करण्याचे उदिदष्ट दिलेले असुन पुणे जिल्हयात २० ते ५०वर्षे वयोगटातील ३ हजार २३० इच्छुक महिलांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्यापैकी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील गठीत समितीने 1 हजार ७२६ लाभार्थ्यांना मंजुरी मिळाली आहे. यापैकी पहिल्या टप्प्यातील ६० लाभार्थी महिलांना २१ एप्रिल २०२५ रोजी, दुपारी १ वाजता कृषी महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे येथे उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ६० कायनेटिक ग्रिन कंपनीचे “पिंक ई- रिक्षा” वितरीत करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, महिला व बाल विकास विभाग सचिव डॉ. अनुपकुमार यादव , विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आयुक्त महिला व बाल विकास नयना गुंडे, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंग , जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी,मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील उपस्थित राहणार आहे.

महिला व बाल विकास विभागाच्या वतीने आठ जिल्हयातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे, सशक्तीकरणास चालना देण्यासाठी तसेच महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी शहरात इच्छुक महिलांना पिंक रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व रिक्षा चालविण्यासाठी इतर सोई सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी “पिंक ई- रिक्षा ” योजना सुरू करण्यात आलेली आहे.

#

Comments are closed

error: Content is protected !!