नवी सांगवी,दि.१३ :- जनता शिक्षण संस्थेच्या नवी सांगवी येथील श्रीमती शांतीदेवी जयसिंग हुजा गुरुनानक हायस्कूल प्रशालेचा दहावीचा शंभर टक्के निकाल लागला असून यंदाही शंभर टक्के निकालाची परंपरा राखली आहे.
यशस्वी विद्यार्थी खालील प्रमाणे
१. पिरजादे अहद ९५.४० %
२. चोरमले अनुष्का ९४.८० %
३. नारखेडे परिमल ९३.२० %
४. सुर्यवंशी दर्पण ९२.८० %
५. भुजबळ सवीरा ९२.२० %
मुख्याध्यापिका नंदा काकडे व प्रीति चव्हाण यांनी मुलांच्या उज्वल यशाबद्दल बोलताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेला अभ्यास हे त्यांच्या यशाचे गमक आहे. सातत्यपूर्ण अभ्यास हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे ती विद्यार्थ्यांनी सार्थ ठरवली आहे .
जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश जगताप व जनरल सेक्रेटरी सुभाष जावळे तसेच सर्व संचालक मंडळ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Comments are closed