म्हाडाच्या 4186 सदनिकांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
पुणे : सुधारित वेळापत्रकानुसार पुणे मंडळातर्फे सदनिका वितरणासाठी प्राप्त अर्जाची संगणकीय सोडत आता दि. ११ डिसेंबर, २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता काढण्यात येणार आहे.
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीएसह सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील ४,१८६ सदनिकांच्या विक्रीकरिता आयोजित संगणकीय सोडतीसाठी अर्ज सादर करण्यासाठी दि. २० नोव्हेंबर, २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे, इच्छुकांना घर खरेदीसाठी आणखी एक संधी मिळणार आहे.
कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी व इतर कारणास्तव अर्ज करण्यासाठी मुदतवाढ मिळण्याविषयी नागरिकांकडून सातत्याने मागणी करण्यात येत होती. यामुळे सदरची मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावरील योजनांच्या सदनिकांसाठी https://lottery.mhada.gov.in व bookmyhome.mhada.gov.in या
ठिकाणी अर्ज करा.
भरणा प्रक्रियेकरिता मार्गदर्शन करणारी माहिता पुस्तिका https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्जदारांच्या सोयीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. अर्ज प्रक्रियेबाबत मदतीसाठी ०२२-६९४६८१०० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन साकोरे यांनी केले आहे.
सदनिकांच्या वितरणासाठी म्हाडाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही. अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नये तसे केल्यास पुणे मंडळ कोणत्याही फसवणूकीस जवाबदार राहणार नाही.

Comments are closed