नवी सांगवी : प्रभाग क्रमांक ३१ मधून नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेले जनसेवक अमित पसरणीकर यांनी मोठ्या उत्साहात आणि दिमाखात आपल्या प्रचाराची सुरुवात केली असून सध्या त्यांनी संपूर्ण प्रभाग पिंजून काढला आहे. घरोघरी भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधण्यावर त्यांनी भर दिला असून, प्रत्येक कुटुंबाच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेत त्या सोडवण्यासाठी ठोस आश्वासन दिले आहे. विशेष म्हणजे, प्रचारादरम्यान काही नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांवर तात्काळ उपाय करत त्यांनी आपल्या कार्यक्षमतेची चुणूक दाखवली आहे.

अमित पसरणीकर हे गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागातील सामाजिक व स्थानिक प्रश्नांसाठी सातत्याने काम करत आहेत. रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठ्याच्या अडचणी, वीजेचे प्रश्न, स्वच्छतेचा अभाव, वाहतूक व सुरक्षिततेचे मुद्दे अशा विविध समस्यांबाबत त्यांनी नेहमीच आवाज उठवला आहे. त्यामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सुशासन, स्वच्छता आणि सुरक्षितता या त्रिसूत्रीवर आधारित प्रभाग उभारण्याचा त्यांचा ठाम संकल्प आहे. रस्ते, पाणी, वीज यांसारख्या मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे, स्वच्छ व नियोजनबद्ध प्रभाग घडवणे हे त्यांच्या अजेंड्यातील प्रमुख मुद्दे आहेत. महिलांसाठी सुरक्षित वातावरण, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा, तसेच युवकांसाठी उपयुक्त व सकारात्मक उपक्रम राबवण्यावर ते विशेष भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
“आपल्या प्रभागातील प्रत्येक नागरिक ही माझी जबाबदारी आहे. सेवाभावाने आणि प्रामाणिकपणे विकास करण्याचे वचन देतो,” अशी ग्वाही अमित पसरणीकर यांनी दिली.
“उद्याची स्वप्ने, आजची साथ—तुमच्या मताने होईल उज्ज्वल वाट,” या संदेशासह त्यांनी नागरिकांना सोबत येण्याचे आवाहन केले आहे.

Comments are closed