पुणे,दि.२४(punetoday9news):- पुणे शहरातील विमाननगर येथे मेट्रोचा पुल पडला असे फोटो व्हायरल होत आहेत. सोशल मेडियांच्या माध्यमातून या फेक मेसेजचा पुर आला आहे. त्यामुळे पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी हे व्हायरल होणारे फोटो पुण्यातील नसून अशी कोणतीही दुर्घटना पुण्यात झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
तसेच अशा प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्या मेसेज व फोटो वर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
मेट्रोचा निर्माणाधिन पूल कोसळल्याची छायाचित्रे समाज माध्यमातून, विशेषतः #WhatsApp वरुन मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून ती छायाचित्रे पुण्यातील असल्याचा दावा केला गेलाय. मात्र या दाव्यात कोणतेही तथ्य नसून अशी कोणतीही घटना पुण्यात घडलेली नाही.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) August 24, 2020
Comments are closed