सुबोध भावेंनीही कंगनाला सुनावले खडे बोल. मराठी अस्मितेचा मुद्दा कंगनाला चांगलाच भोवणार.
मुंबई, दि. ५ .(punetoday9news):- प्रसिद्धीच्या हव्यासापोटी महाराष्ट्राच्या कारभारावरच बोट ठेवणाऱ्या कंगनाला याचे परिणाम भोगावे लागणार अशीच चिन्हे दिसू लागली आहेत. कारण आता मराठी अभिनेते आपल्या महाराष्ट्राचा व मुंबईचा झालेला अपमान सहन करू शकत नाहीत त्यानुसार सुबोध भावे, रितेश देशमुख, स्वप्नील जोशी यांनी ट्विट करून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
सुबोध भावेने म्हटले आहे की, ज्या शहराने तुला ओळख, काम दिले. त्याचा मान राखला पाहिजे. जर आपणास राजकारण करायचे असेल तर आपल्या स्वतःच्या राज्यात करावे.
https://twitter.com/subodhbhave/status/1301559899915128832?s=19
रितेश देशमुख याने मुंबई ही हिंदुस्थान असल्याचे म्हटले आहे तर स्वप्निल जोशीने माझा मुंबई पोलिसांवर विश्वास आहे असे सांगितले आहे.
सर्व सामान्य मुंबईकरांसोबतच महाराष्ट्रातील कंगनाचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणावर नाराज झाला आहे. त्यामुळे मुंबई विरुद्ध केलेले वक्तव्य कंगनला चांगलेच भोवणार हे सद्यस्थितीत चित्र बनले आहे.
Comments are closed