मुंबई, दि ८( punetodaynews):- वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांकरीता MPSC मार्फत नकारात्मक गुणांच्या अंमलबजावणीसाठी सुधारित कार्यपद्धती आयोगाने जाहीर केली आहे.
यानुसार आता 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी वजा होणार असून परीक्षांचा निकाल अपूर्णांकात लागणार आहे.
एकूण गुणांमधून प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 25 टक्के किंवा 1/4 एवढे गुण वजा करण्यात येणार. नकारात्मक गुणांची पद्धत एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर लागू असणार नाही. एखाद्या प्रश्नासाठी एकापेक्षा अधिक उत्तरे दिल्यास सदर उत्तर चुकीचे समजण्यात येऊन सदरील उत्तरासाठी एकूण गुणांमधून 25 टक्के किंवा 1/4 एवढे गुण वजा करण्यात येणार.
यानुसार कार्यपद्धती करत असताना एकूण गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरी ती तशीच ठेऊन पुढील कार्यवाही केली जाणार आहे. सदरील नवी कार्यपद्धती यापुढे आयोगामार्फत जाहीर होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा तसेच चाळणी परीक्षांसाठी लागू असणार असून या परीक्षांच्या निकालासही लागू असणार आहे.
Comments are closed