मुंबई, दि. १३( punetoday9news):- राज्यातील प्रत्येक घरातील प्रत्येक सदस्यांची पुढील महिन्याभरात किमान दोन वेळेस शासकीय टीमकडून आरोग्य चौकशी होणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे.

राज्य शासनाने सुरु केलेल्या ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

याबाबत  मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की,  महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी आहे, या बारा कोटी जनतेची आरोग्य तपासणी ही अवघड गोष्ट आहे, यासाठी प्रत्येकाची घरे शोधणे ही कठीण बाब आहे पण तरी शक्य आहे.

सरपंचापासून खासदारापर्यंत सर्व लोकप्रतिनिधींनी आपापल्या वॉर्डाची जबाबदारी घेतली तर संपूर्ण महाराष्ट्र आपण व्यापू शकतो.

या योजनेसाठी शासनाच्या आरोग्य विभागाचे व महसूल विभागाचे कर्मचारी काम करतील. त्यांच्यासोबत यामध्ये पक्षाचे कार्यकर्ते देखील सहभागी होऊ शकतात.

आजाराची कोणती लक्षणे आहेत का? याचे उपचार कुठे व कसे करायचे याचे मार्गदर्शन व याची संपूर्ण माहिती शासकीय टीम त्यांना देईल . मुंबईत ज्या प्रकारे ‘चेस द व्हायरस’ ही योजना राबवली जात आहे त्याचप्रमाणे ही योजना राज्यभरात राबवली जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!