दिल्ली, दि. १८ ( punetoday9news):-  गुगलने पेटीएमला गँबलिंग पॉलिसीचे उल्लंघन केल्यामुळे प्ले स्टोअरवरुन हटवले होते. मात्र पेटीएमची ४ तासानंतर गुगल प्ले स्टोअरवर वापसी झाल्याची माहिती पेटीएमने ट्वीटरवरून दिली आहे.

गुगलने सांगितले की,  स्पोर्ट्स बेटिंगची सुविधा देणाऱ्या अवैध गँबलिंगचे समर्थन केले जाणार नसून ऑनलाइन कसीनोला परवानगी देऊ शकत नाही.

आम्ही प्ले स्टोअरमध्ये गुगलच्या पॉलिसीजचे उल्लंघन करणाऱ्या अ‍ॅप्सला राहण्याची परवानगी देऊ शकत नाही. दरम्यान, गुगल पे आणि पेटीएम हे दोन्ही पेमेंट प्लॅटफॉर्म असल्यामुळे त्यांची आपसांतदेखील स्पर्धा असल्यामुळे गुगलने पेटीएम हटवल्याचा आरोप केला जात होता. मात्र आता पेटीएम गुगलवर परतल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

 

Comments are closed

error: Content is protected !!