महाराष्ट्रात शाळा सुरूसाठी प्रतिक्षाच; कोरोना पेशंटची संख्या पाहता दिवाळीनंतरचा मुहूर्त .
दिल्ली, दि. २१ ( punetoday9news):- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशभरात लॉकडाऊन करण्यात होते. पण मोदी सरकारनं आता शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 
 आजपासून काहीठिकाणी सांस्कृतिक, मनोरंजन, धार्मिक सामाजिक कार्यक्रमांमध्ये १०० लोकांना मास्क लावून सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे.
 बिहार, राजस्थान, हरियाणा, चंदिगड, हिमाचल प्रदेश, जम्मू-कश्मीर, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मेघालय, नागालँड या राज्यांत आजपासून ५०%  उपस्थितीसह शाळा सुरु करण्यात येणार आहेत.
 महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आताच शाळा सुरू करता येणार नसल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
 मात्र इतर राज्यात शाळा सुरु करण्यासाठी या अटीशर्थीं राहणार आहेत.
• फक्त 50 टक्के शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसह शाळा सुरू होतील
• पालकांच्या लेखी परवानगीने विद्यार्थी शाळेत येऊ शकतील
• कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व उपाय केले जातील, तसेच सर्व अटी शर्थींचं पालन करण्यात येईल
• मास्क आणि सोशल डिस्टंन्सिग बंधनकारक असणार आहे
• शाळेच्या गेटवर थर्मल स्क्रिनिंग करण्यात येईल
• सध्या ज्या शाळा कन्टेन्मेट झोनमध्ये नाहीत त्याच सुरू होणार
• कन्टेन्मेट झोनच्या बाहेर असणाऱ्या शाळांमध्येही फक्त त्याच विद्यार्थी आणि शिक्षकांना परवानगी देण्यात येणार जे कन्टेन्मेट झोनमध्ये राहत नाहीत.
• शाळेत येणारे विद्यार्थी, शिक्षण आणि कर्मचाऱ्यांनाही कन्टेन्मेट झोनमध्ये जाण्याची परवानगी नाही.

Comments are closed

error: Content is protected !!