Tech. ( punetoday9news):- मार्क झुकेरबर्ग याने फेसबुक कनेक्ट व्हर्च्युअल कॉन्फरन्समध्ये बोलताना ‘फेसबुक नव्या वर्षात म्हणजेच २०२१ मध्ये स्मार्ट चष्मा बाजारात आणणार असल्याची’ घोषणा केली आहे.
त्यासाठी रे-बॅन लॅक्सोटीका बरोबर काम सुरु असल्याचे फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गने म्हटले आहे. यावेळी नेक्स्ट जनरेशन क्वेस्ट-२ वायरलेस व्हीआर हेडसेट सादर केले गेले.
रे-बॅन ब्रँड खालीच हे चष्मे येतील पण या स्मार्ट चष्म्यामध्ये एक इंटिग्रेटेड डिस्प्ले असेल.
या डिस्प्लेशिवाय व्हॉइस असिस्टंट असू शकेल असे संकेत दिले गेले आहेत.
रे-बॅन २०२१ मध्ये ब्रांडेड फॅशन फॉरवर्ड स्टाईलसह इनोव्हेटिव्ह टेक्नोलॉजीचा मेळ घालून स्मार्ट ग्लास रिलीज होणार असे म्हटले गेले आहे.
मात्र कोणत्या नावाने हा चष्मा बाजारात येईल किंवा त्याची किंमत काय असेल, याची माहिती सांगण्यात आली नाही.
Comments are closed