मुंबई, दि. ३०( punetoday9news):- राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु करण्यात आलेल्या मिशन बिगिन अंतर्गत अनलॉक- ५ ची नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

५ ऑक्टोबरपासून राज्यातील रेस्टॉरंट व बार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आ मात्र एकूण क्षमतेच्या ५० % ग्राहकांची अट असणार आहे.

मुंबई महानगर प्रदेशाअंतर्गत येणाऱ्या अनावश्यक वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या उद्योगांना उत्पादन सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

राज्यांतर्गत रेल्वे सुरू करण्याचा निर्णय तसेच मुंबई महानगर प्रदेशातील लोकल रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत.  सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील कामगारवर्ग लोकलने प्रवास करू शकतो.

मुंबईतील डबेवाल्यांना एमएमआर विभागात लोकलमधून प्रवासासाठी मुभा मात्र मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाकडून क्यूआर कोड घ्यावा लागणार आहे.

मुंबईतील सिंगल स्क्रीन आणि मल्टिप्लेक्सदेखील लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात उद्या एक महत्त्वाची बैठक होणार आहे. वरील सर्व गोष्टींना परवानगी देण्यात आली असली तरी मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे अनिवार्य राहणार आहे.

 

Comments are closed

error: Content is protected !!