मुंबई, दि.९ ( punetoday9news):- मराठा संघटनांकडून शनिवारी म्हणजेच १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते मात्र हा बंद मागे घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मराठा संघटनांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यंत्री अजित पवार यांच्यासोबत गुरुवारी झालेल्या चर्चेनंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत अपेक्षित आणि यशस्वी चर्चा झाली असून उद्याचा बंद हा तात्पुरता स्थगित करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

मराठा संघटनांच्या वतीने सुरेश पाटील यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक झाली असून १ महिन्यांचा अवधी त्यांनी घेतला आहे. याशिवाय MPSC परीक्षा पुढे ढकलण्याबाबतही चर्चा सकारात्मक झाल्याचे सुरेश पाटील यांMPSC परीक्षा पुढे ढकलण्याची चर्चा सकारात्मक झाल्याचे सुरेश पाटील यांनी सांगितले. सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली. महिन्याभरात आम्ही दोन्ही प्रलंबित प्रश्नावर तोडगा काढू असे आश्वासन सरकारकडून मिळाल्यामुळे आम्ही तात्पुरता बंद मागे घेत असल्याची माहिती सुरेश पाटील यांनी दिली आहे.

Comments are closed

error: Content is protected !!