पनवेल, दि.२१ (punetoday9news) :- पनवेल मध्ये राहणाऱ्या एका १४ वर्षीय मुलाने आपल्या शेजारी राहणाऱ्या ११ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पनवेल शहर पोलिसांनी या अल्पवयीन मुलावर बलात्कारासह पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.
या घटनेतील अल्पवयीन मुलगा व पीडित मुलगी हे दोघेही एकाच इमारतीत राहण्यास असून पीडित मुलीची आई कामाला जात असल्याने दिवसभर ती व तिचा भाऊ हे दोघे घरीच असतात. गेल्या आठवड्यात पीडित मुलगी दुकानातून घरी परतत असताना, तिच्या शेजारी राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलाने तिला जबरदस्तीने इमारतीच्या गच्चीवर नेले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकाराची माहिती कुणाला सांगितल्यास तिच्या भावाला ठार मारण्याची धमकीही दिली. मात्र दुसऱ्या दिवशी तिला त्रास जाणवू लागल्यानंतर आईने तिच्याकडे विचारपूस केली. त्यानंतर तिने घडल्या प्रकाराची माहिती आईला दिली. त्यानंतर मुलीच्या आईने पनवेल शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
Comments are closed