मुंबई,दि.२४ (punetoday9news) :- देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे त्याची माहिती त्यांनी स्वत: ट्वीट करून दिली आहे. आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे, “लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी. माझी कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे.”
“माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी,” असेही त्यांनी म्हटले आहे.
यापूर्वी महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री बच्चू कडू, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, ऊर्जामंत्री नितीन राऊत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार नवनीत राणा यांचा समावेश आहे.
Comments are closed