पिंपरी, दि. २८ (punetoday9news) :- पिंपरी चिंचवड शहर आणि वाहनांची तोडफोडीचे प्रकार सातत्याने सुरूच आहे. कधी दोन गटातील भांडणातून, कधी वर्चस्वासाठी तर कधी दहशत निर्माण करण्यासाठी ही तोडफोड झाल्याचे प्रकार झाले आहेत .
मात्र यावेळी पिंपरी चिंचवड मधील वेताळनगर भागात चक्क बहिणीने प्रेम विवाह केला, या रागातून एका अल्पवयीन भावाने बारा वाहनांची तोडफोड केली आहे. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी एकाला अटक तर एकास ताब्यात घेतले आहे. पण या सर्वात विनाकारण १२ गाड्यांची तोडफोड झालेल्या वाहनमालकांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे . कशाचा राग कशावर काढायचा ? हे तरी या युवकांना कळायला हवं असं नागरिकांचे म्हणणे आहे . तोडफोड करून विनाकारण गाडीच्या मालकांना विनाकारण भुर्दंड पडल्याचा प्रकार झाला आहे .याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी एकाला अटक तर एकास ताब्यात घेतलं आहे.

Comments are closed