सांगवी, दि.९(punetoday9news):- पार्थ पवार फौंडेशनच्या वतीने आय.पी.एल.क्रिकेट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्रुतुराज गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला.
तसेच ॠतुराजचे आई सविता गायकवाड व वडील दशरथ गायकवाड यांना आदर्श माता-पिता दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते अजित सिंह कोचर व नगरसेवक राजाभाऊ बनसोडे व रविंद्र बाईत यांच्या हस्ते देण्यात आला. तसेच शाल श्रीफळ व स्मृतीचिन्हही देण्यात आले.
यावेळी अशिष उबाळे, सुनील साठे, योगेश बोराडे, गणेश जाधव, सुचित्रा कांबळे, पराग ओगळे, रिबेका दास, नगरसेवक राजाभाऊ बनसोडे , निलेश हाके, अँलेक्स दास, मोशिन शेख, नरेश सुतार, लक्ष्मण उपार, रूपेश सार उपस्थित होते .
यावेळी मनोगत व्यक्त करताना बनसोडे म्हणाले की, आपल्या पिंपरी चिंचवड विभागातुन भारतीय संघात निवड व्हावी असा उदयोन्मुख खेळाडू त्रुतुराज तयार झाला असून भारतीय संघात निवड होण्यासाठी त्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रविंद्र बाईत व आभार प्रदर्शन अक्षय कळसकर यांनी केले.
Comments are closed