पिंपरी,दि.१२(punetoday9news):- दिव्यांग प्रतिष्ठाण व दृष्टी व्हिजन फॉर ब्लाइंड पिंपरी-चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळीनिमित्त १२० दिव्यांग कुटुंबाना दिवाळी धान्य व दिवाळी फराळ वाटप करण्यात आले.
बिजलीनगर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दिवाळी फराळ वाटप करण्यात आलेल्या दिव्यांग कुटुंबामध्ये ५१ शारीरिक दृश्य दिव्यांग आणि ६८ अंध महिला होत्या. या कार्यक्रमाला शेखर चिंचवडे, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, रवि कळंबेकर, माऊली सूर्यवंशी, प्रवीण मंडलेचा, हरीश सरडे, दलीत नायडू गंडी, भुलेश्वर बोरुडे, वसुधा देशपांडे, पांडुरंग बोरुडे, महेश काशीद आदी उपस्थित होते.
Advt:-
Comments are closed