सांगवी, दि.२३(punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी फाटा येथे औंध कडून राजीव गांधी पूलावरून पिंपरी चिंचवड शहरात प्रवेश करताच लाल रंगाचा सिग्नल देणारा खांब दिव्यासहित खाली पडूनही काही दिवसापासून काम करत आहे. मात्र प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे.
वाहनाच्या धडकेने हा खांब दिव्यासहित खाली पडून कित्येक दिवस उलटूनही प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही. यातच दुसरीकडे डीमार्ट कडे जाणारा पूल बंद असल्याने सर्व वाहतूक ही याच बाजूने चालू आहे मात्र हा दिवा खाली पडलेल्या अवस्थेत चालू बंद होत असल्याने नवीन वाहन चालकांना गोंधळून टाकत आहे. तसेच त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. याच ठिकाणी पूल सुरू होताना रिफ्लेक्टरची ही आवश्यकता आहे. सांगवी कडे जाणाऱ्या भुयारी मार्गातही सर्व दिवे कार्यान्वित नसल्याने पुरेसा प्रकाश नसल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे.
वाहतूक विभाग व प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाबाबत वाहन चालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
Comments are closed