औंध,दि. २९(punetoday9news):- शहरात कडाक्याची थंडी वाढू लागल्याने व वाढत्या करोनाच्या प्रभावामुळे सारथी वाहतूक आघाडी असोसिएशन संस्थेकडून शहरातील पोलीस व अनाथ बांधवाना ब्लँकेट, मास्क व खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी संस्थापक अध्यक्ष योगेश कांबळे, खजिनदार राकेश शिंदे, संभाजी बिग्रेड पुणे जिल्हा अध्यक्ष आणि सारथी संस्थेचे सचिव सागर पोमण, कार्याध्यक्ष प्रशांत राठोड, संचालक याकूब पठाण , करण कोळी, चेतन भगत, शिवकुमार उमरदंड, कैलास भामे, विशाल शिरसागर, कैलास वनारसे, राम शाहीर, रवि गायकवाड, अर्जुन शिंदे, हनुमंत ठोंबरे, गंगाधर सोलापुरे, उमेश हिरवळे, बाबू चेडे, आदी उपस्थित होते. कात्रज, कोंढवा, हडपसर, खडीमशीन चौक, उंड्री, स्वारगेट, पुणे स्टेशन, ससून रुग्णालय, पूलगेट, सातववाडी आदी ठिकाणी साहित्याचे वाटप करण्यात आले.
रस्त्यावरील आनाथ बांधवाना १०० ब्लँकेट आणि खाऊ वाटप रात्री १० ते ४ पर्यंत संस्थेचे सभासदांनी रस्त्यावर फिरून वाटप केले.
सारथी संस्थेकडून असे विविध उपक्रम राबविण्याचे आश्वासन संस्थापक अध्यक्ष योगेश कांबळे यांनी दिले. तसेच कोरोनाच्या काळात पोलीस बांधव आपल्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र राबतात. सुरक्षेचा उपाय म्हणून सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप करण्यात आले.
Advt:-
Comments are closed