टी२०,दि.२४(punetoday9news):- आयसीसीच्या टी-20 क्रमवारीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला बढती मिळाली आहे. न्यूझीलंडविरुद्ध पाकिस्तान यांच्यातील टी-20 सामन्यांची मालिका संपल्यानंतर आयसीसीने नवीन क्रमवारी जाहीर केली आहे.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आठव्या स्थानावरुन सातव्या स्थानावर आला आहे. तसेच भारताच्या लोकेश राहुलनेही आपलं तिसरं स्थान कायम राखलं आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताच्या एकाही गोलंदाजाला स्थान मिळालेलं नाही.
आयसीसी T-20 रँकिंग-
1) डेविड मलान इंग्लैंड (915)
2) बाबर आज़म पाकिस्तान (820)
3) के एल राहुल भारत (816)
4) आरोन फिंच ऑस्ट्रेलिया (808)
5) रैसी वैन डर डुसेन दक्षिण अफ्रीका (744)
6) ग्लेन मैक्सवेल ऑस्ट्रेलिया (701)
7) विराट कोहली भारत (697)
8) कॉलिन मुनरो न्यूझीलंड (695)
9) टिम सीफर्ट न्यूझीलंड (685)
10) हजरत जजई अफगानिस्तान (676)
तसेच, पाकिस्तानविरुद्ध तिन्ही सामन्यात धडाकेबाज खेळी करणाऱ्या सेफर्टच्या क्रमवारीत चांगलीच सुधारणा झाली असून त्याच्या क्रमवारीत 24 स्थानांनी सुधारणा झाली आहे. सेफर्ट नवव्या स्थानावर पोहोचला आहे.
Comments are closed