रहाटणी,दि.५ (punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर, रहाटणी परिसरात गेल्या काही दिवसांपासून प्रभाग क्र. २८ मध्ये कमी दाबाने अपुरा पाणी पुरवठा होत आहे . तसेच वारंवार या परिसरात पाण्याची समस्या निर्माण होत आहे . त्यामुळे त्या संदर्भात नाना काटे यांनी आयुक्तांना निवेदन देऊन पाणी प्रश्न त्वरित सोडविण्याची मागणी केली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी योजने अंतर्गत स्मार्ट प्रभाग म्हणून या पिंपळे सौदागर प्रभागाकडे पाहिले जाते परंतु प्रभागातील अनेक सोसायट्यामध्ये उदा. कुणाल आयकॉन, जिंजर, ओरोवेट, ब्लुवुडस, रोझवुड, समृद्धी पार्क, रोझ व्हॅली, द्वारका लॉर्ड, रॉयल ईम्पेरीयो, मन मंदिर, द क्रिस्ट, पुर्वा रेसीडेन्सी, फ्लोरा रेसीडेन्सी या सोसायटीमध्ये कमी प्रमाणात व कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. पुरेसे पाणी मिळण्यासाठी प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करत महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे सहशहर अभियंता रामदास तांबे, कार्यकारी अभियंता अजय सुर्यवंशी यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनसुध्दा प्रत्येक वेळी फिडर प्रोब्लेम, पाईप लाईन फुटणे , वीजप्रवाह खंडित झाल्याची सबब देउन समस्येकडे दुर्लक्ष करून टाळाटाळ करीत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
तरी या प्रकरणात आयुक्तांनी लक्ष्य देऊन प्रभाग २८. पिंपळे सौदागर,रहाटणी मधील नागरिकांची दैनंदिन गरज असलेली तसेच प्रभागात कायमची समस्या असलेली पाणी समस्या लवकरात लवकर सोडवावी अशी मागणी केली आहे तसेच प्रशाशनाने त्वरित समस्या न सोडविल्यास सोसायटीमधील नागरिकांना घेवुन रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ही दिला आहे .

Comments are closed