मुंबई,दि.१८(punetoday9news):- रिलायन्स उद्योग समुहाचे मालक मुकेश अंबानी आता अब्जाधीशांच्या यादीत टॉप टेनमधून बाहेर पडले आहेत.
ते आता अकराव्या स्थानी पोहचले आहेत. मुकेश अंबानी यांची संपत्ती आता 7970 कोटी डॉलर रुपये म्हणजे जवळपास सहा लाख कोटी रुपये इतकी आहे. या वर्षी त्यांच्या संपत्तीत 303 कोटी डॉलरची भर पडली आहे. गेल्या वर्षी रिलायन्सच्या शेअर्सच्या किंमतीत वाढ झाल्याने त्यांच्या संपत्तीतही वाढ झाली होती आणि ते अब्जाधीशांच्या यादीत पाचव्या स्थानी पोहचले होते.
टॉप टेन अब्जाधीश
जेफ बेझोस: 19100 कोटी डॉलर
इलॉन मस्क: 19000 कोटी डॉलर
बिल गेट्स: 13700 कोटी डॉलर
बनॉर्ड अरनॉल्ट: 11600 कोटी डॉलर
मार्क झुकरबर्ग: 10400 कोटी डॉलर
झांग शानशन: 9740 कोटी डॉलर
लॅरी पेज: 9740 कोटी डॉलर
सर्जेई बिन: 9420 कोटी डॉलर
वॉरेन बफे: 9320 कोटी डॉलर
स्टीव्ह बाल्मर: 8760 कोटी डॉलर
Comments are closed