• हाच आमच्यासाठी लोकसभा-विधानसभा चा गुलाल- महेश लाड.
• सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शिवछत्रपती गौरव मानपत्र.
पुणे,दि.१९( punetoday9news):- पुणे शहरातील येरवडा येथील नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयात शिवजयंतीच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शाळेच्या प्रांगणातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पुष्पहार अर्पण करून शिवजयंती उत्सवाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज यांच्यावर पोवाडे, चटकदार भाषणे सादर केली. तसेच काही शिक्षकांनी देखील मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी स्वराज्य संग्राम चे अध्यक्ष महेश लाड, महिला आघाडी च्या मनीषा पुरी, संपर्कप्रमुख हेमंत आंबवडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका ढगे तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी विविध मान्यवरांनी शिवरायांच्या इतिहास मांडला. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना स्वराज्य संग्राम चे अध्यक्ष महेश लाड म्हणाले की, ” आपल्या माध्यमातून आयएएस, आयपीएस अधिकारी तयार झाले, मोठे उद्योजक तयार झाले तर हाच आमच्यासाठी लोकसभा-विधानसभेचा गुलाल असेल.”
शिवजयंती नाचून साजरी करण्यापेक्षा वाचून साजरी झाली पाहिजे असे मत मुख्याध्यापिका ढगे यांनी व्यक्त केले.
स्वराज्य संग्राम च्या वतीने “नेताजी सुभाषचंद्र बोस माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शिवछत्रपती गौरव मानपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाचे संयोजन आणि सूत्रसंचालन सुरज कुलकर्णी व शिक्षिका वामने यांनी केले.
Comments are closed