हा व्हिडिओ फॉरवर्ड करणाऱ्याचे नाव व मोबाईल क्रमांक तसेच ग्रूपचे नाव ( स्क्रीन शॉट सह) पाठवल्यास होणार योग्य कारवाई.
नागरिकांनो वेळीच सावध व्हा, कोणतीही पोस्ट सोशल मेडीया वर विचारपूर्वक फॉरवर्ड करा.
सजग नागरिक बना , प्रशासनाला सहकार्य करा व विचारपूर्वक कृती करा.
पुणे, दि.२०( punetoday9news):- “पुण्यात सोमवारपासून पुन्हा पंधरा दिवस लॉकडाऊन” या अशा आशयाच्या जुन्या बातमीचा व्हिडीओ पुन्हा एकदा काही खोडसाळ प्रवृत्तीच्या व्यक्तीकडून व्हायरल केला असून त्याद्वारे नागरिकांची दिशाभूल काही समाजकंटकांकडून केली जात आहे .
सध्या तरी पुण्यात प्रशासनाने असे कोणतेही आदेश दिलेले नाहीत, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
हा व्हिडिओ फॉरवर्ड करणाऱ्याचे नाव व मोबाईल क्रमांक तसेच ग्रूपचे नाव ( स्क्रीन शॉट सह) पाठवल्यास योग्य ती कारवाई केली जाईल. कृपया, कोणीही अफवा पसरवू नये, असे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी कळविले आहे.
Comments are closed