• लसीकरणाकरिता नोंदणी करण्यासाठी https://selfregistration.cowin.gov.in/ या लिंकचा वापर करावा.

पिंपरी,दि.२( punetoday9news):- केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांच्या कोवीड -१ ९ लसीकरणाला महापालिकेच्या वतीने दि.०१ मार्च पासून सुरुवात करण्यात आली आहे .

शासनाच्या निर्देशानुसार साठ वर्षे वयावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना कोवीड -१ ९ लस दिली जाणार आहे . तसेच विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या वय वर्षे ४५ ते ६० या दरम्यानच्या वयोगटातील व्यक्तींनाही विहीत वैद्यकिय प्रमाणपत्र असलेस कोवीड -१ ९ ची लस देण्यात येणार आहे . महापालिकेच्या आठ कोवीड -१ ९ लसीकरण केंद्रांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे .

यामध्ये पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय , नवीन भोसरी रुग्णालय , नवीन जिजामाता रुग्णालय , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय चिंचवड , पिंपळे निलख दवाखाना , कासारवाडी दवाखाना , यमुनानगर रुग्णालय आणि ईएसआय रुग्णालय चिंचवड यांचा समावेश आहे . या आठ ठिकाणी ही लस मोफत दिली जाणार आहे . शहरातील इतर १२ खासगी रुग्णालयांमध्ये देखील लसीकरणाची सुविधा उपलब्ध असणार आहे , मात्र त्यासाठी नाममात्र शुल्क आकारण्यात येईल . अतिजोखमीच्या जसे हृदयविकार , हृदय मधुमेह , उच्च रक्तदाब , स्ट्रोक , मुत्रपिंडाशी ( Kidney ) , यकृत , श्वसन , कर्करोग , रोग प्रतिकारक शक्ती कमी असलेले ( HIV ) , रक्तदोष इत्यादी आजार व सदर आजाराशी निगडीत इतर आजार असणारे रुग्ण , डायलेसिसवरील रुग्ण इत्यादी आजार व उपचारी खाली असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी कोवीड -१ ९ ची लस देण्यात येणार आहे . परंतु याकरीता सदर रुग्णांना सदरचा आजार असुन उपचार सुरु असल्याबाबत मान्यता प्राप्त वैद्यकीय व्यावसायिक यांचेकडून प्रमाणीत केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे .

सदर कामी नागरीकांनी लसीकरणाकरिता नोंदणी करण्यासाठी https://selfregistration.cowin.gov.in/ या लिंकचा जास्तीत जास्त वापर करावा . लसीकरणाच्या ठिकाणी कोणीही वरीलप्रमाणे पुर्व नोंदणी शिवाय अनावश्यक गर्दी करु नये . तसेच त्या ठिकाणी प्रत्येकाने मास्कचा वापर करावा व सामाजिक अंतर ठेवावे असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!