पुणे,दि.१६( punetoday9news):-

 

 • सद्यस्थितीत नियमांना वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम पुणेकर व पिंपरी-चिंचवडकर करत आहेत त्यामुळे नवीन नियमांचे तंतोतंत पालन होणार की कागदी घोडे नाचणार याकडे सर्वांचे लक्ष. 

नवीन नियमानुसार :-

१. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, सिंगल स्क्रीन थीएटर्स आणि मल्टिप्लेक्स ५० टक्के क्षमतेने चालवण्यास परवानगी असेल.

 

२. कोणत्याही राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमाला परवानगी असणार नाही.

 

३. लग्न समारंभाला केवळ ५० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी असेल. तर अंत्यविधीला केवळ २० जण उपस्थित राहू शकतात.

 

४. आरोग्य सेवा आणि अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कार्यालये ५० टक्के कर्मचारी क्षमतेने चालवावीत. वर्क फ्रॉम होमवर भर देण्यात यावा.

 

५. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापनाने दरताशी येणाऱ्या भाविकांचे प्रमाण उपलब्ध जागेच्या अनुषंगाने मर्यादित करावे.

 

पुर्वी:-

* पुर्वी नियम असतानाही हाॅटेल, रेस्टॉरंटमध्ये कित्येक ठिकाणी ग्राहकांची गर्दी पहायला मिळत होती. सॅनिटायझर, थर्मामीटर मशीन गायब.

* यापूर्वी कित्येक ठिकाणी राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र कित्येक प्रसारमाध्यमांनी दाखवले आहे. विविध प्रकारच्या कार्यक्रमांंचे मोठ्या प्रमाणावर आयोजन.

* सत्ताधारी राजकीय नेते मंडळींनी आयोजित केलेल्या लग्न समारंभात नियमांचे पालन करण्यात आले नव्हते.

 

* सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या बस, रिक्षा ही पुर्ण क्षमतेने वाहतूक करताना आढळून येत होत्या .

 

* धार्मिक स्थळे याबाबत कठोर नियमांचे पालन करत नसल्याचे वृत्तवाहिन्यांनी चित्र दाखवले आहे.

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!