पुणे, दि.३१( punetoday9news):-  पुणे महानगरपालिका कामगार कल्याण निधीतून कोरोना विषाणूच्या संसर्गाने बाधित होऊन दिवंगत सेवकांच्या वारसास कोरोना विषाणू (कोव्हिड-१९) प्रतिबंध व उपचार सुरक्षा कवच योजना लागू करण्यात आली आहे. डिसेंबर २०२० अखेर ५१ (४७ कायम, ४ कंत्राटी) अधिकारी, सेवक कोरोना विषाणू (कोव्हिड-१९) संसर्ग होऊन दिवंगत झाले आहेत. सदर योजने अंतर्गत सर्व मृत सेवकांच्या वारसांना २५ लाख अनुदान देण्याची शिफारस करण्यात आहे.

 तसेच दि. ३१ रोजी महापौर, मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात ५ मृत सेवकांच्या वारसांना २५ लाखाचा धनादेश, सन्मानपत्र व शाल देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

सदर कार्यक्रमास उपमहापौर सरस्वतीताई शेंडगे, सभागृह नेता गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, आबा बागुल, पृथ्वीराज सुतार, सुनिताताई वाडेकर, अजय खेडेकर, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) रुबल अग्रवाल, मुख्य कामगार अधिकारी शिवाजी दौंडकर व इतर पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

 

 


Comments are closed

error: Content is protected !!